1)
बदक माहिती
- बदक हा उभयचर पक्षी आहे जो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बदक सामाजिक प्राणी आहे आणि थवा तयार करून एकत्र रहातात.
- अंटार्क्टिका सोडून इतर सर्व ठिकाणी बदक आढळतात.
- बदक हंस आणि बगळ्यांशी संबधित आहेत. पाळीव बदकांच्या ४० हून अधिक प्रजाती आहेत. सुमारे ५०० वर्षापासून बदकांना पाळण्यात येत आहे.
- बदकाची शरीरयष्टी थोडीशी स्थूल असते आणि इतर उभयचर पक्षांच्या मानाने त्यांचे पाय व मान आखूड असतात. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात ज्याचा उपयोग पोहताना व्हलवल्याप्रमाणे होतो.
- बदकाची चोच रुंद, चपटी आणि पिवळसर रंगाची असते.
- बदकाच्या पिसांवर तेलाचा थर असतो ज्यामुळे पिसे कधीच ओली होत नाहीत. दरवर्षी बदकांची जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात. बदकांच्या तेलकट पिसांखाली बारीक पिसे असतात जी त्यांना थंडीत ऊब सुद्धा देतात.
- बदक चोच पंखांवर वारंवार फिरवून त्यांना स्वच्छ ठेवतात. नवीन पिसे येण्याच्या काळात बदक कमजोर असतात व स्वतःचे रक्षण करण्यात असमर्थ असतात. अश्या वेळीस ते सर्व संरक्षणाच्या दृष्टीने एकत्र रहातात.
- बदक उत्तम पोहू शकतोच परंतु उत्तम उडू पण शकतात. बदक जमिनीवर किंवा झाडाच्या ढोलीत घरटी बनवितात. घरटी बनविण्यासाठी गवत, काड्या, पाने व स्वतःची पिसे यांचा उपयोग केला जातो.
- मादा एका वेळीस ५ ते १२ अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असतात. एका महिन्यानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. जन्मतःच त्यांच्या अंगावर पिसे असतात.
- अंड्यातून बाहेर आल्यानंतर काही तासातच बदकाची पिल्ले चालू शकतात ज्यामुळे त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण होते. तसेच पिल्ले काही तासातच पोहू सुद्धा शकतात.
- कोंबड्यांप्रमाणे बदकाचे मांस आणि अंडी सुद्धा खातात म्हणून त्यांना पाळले जाते परंतु मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन होत नाही.
- बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.
- नर बदकापेक्षा मादा बदक जास्त आवाज करते. नर बदकाची पिसे चमकदार असतात व मादा बदकाची पिसे काहीशी निस्तेज असतात.
- बदकाच्या पायाच्या तळव्यांमध्ये रक्तवाहिन्या आणि नसा नसतात ज्यामुळे बदक थंड पाण्यामध्ये पोहू शकतात किंवा थंड पृष्ठभागावरून चालू शकतात.
- बदकाच्या डोळ्यामध्ये तीन पापण्या असतात आणि ते पाण्याखाली उत्तम रीतीने पाहू शकतात.
- काही बदक एका दिवसात ३०० मैलाचे अंतर उडून पर करू शकतात.
- बदक दोन ते बारा वर्षापर्यंत जगू शकतात.
- मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि भारतातील बहुतेक भागांमध्ये आढळून येतो.
- मोर चमकदार हिरवट-निळ्या रंगाचे असतात. त्यांना लांब अशी सुंदर मान असते. त्यांच्या लांब पिसांवर चंद्रासारखे ठिपके असतात. ते हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंगछटांचे असतात. त्यांना लांब पाय आणि तुरा असतो. त्यांची मान गडद निळ्या रंगाची असते.
- तो खूप डौलदार असतो आणि साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पावसामध्ये नृत्य करतो. जेव्हा मोर त्याचा पिसारा फुलवतो, तेव्हा पिसारा एखाद्या मोठ्या रंगीबेरंगी पंख्यासारखा दिसतो.
- मोर मुख्यतः धान्याचे दाणे आणि कीटक यांवर जगतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. लांडोर आकर्षक दिसत नही. ती आकाराने लहान असते. ती एक तपकिरी रंगाचा पक्षी असते. तिच्याकडे रंगीबेरंगी पिसे नसतात. तिचे पायही ओबडधोबड आणि कुरूप असतात.
- सोनेरी मोर बर्मा, आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यामध्ये आढळतात.
- प्राचीनकालापासून, मोराने त्याच्या सौंदर्याने आणि तोऱ्याने कवींचे, सम्राटांचे आणि योद्धांचे चित्त आकर्षित केले आहे. हिंदू पुराणांमध्ये बऱ्याच ठिकाणी मोराचा संदर्भ आढळतो.
- पोपट हा एक रंगबिरंगी आणि सुंदर पक्षी आहे. त्याला लाल वक्र चोच आणि चार नख्या असणारे मजबूत पाय व सोबतच आणि हिरवी पिसे असतात. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते.
- मोर जवळपास सर्वच उष्ण देशांमध्ये आढळतो कारण थंड हवामान त्याला मानवत नाही. तो झाडाच्या पोकळीत राहतो. तो तिथे स्वतःचे घरटे बांधतो आणि मादी तिथे अंडी देतो.
- तो दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. त्याला आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात.
- पोपट खूप हुशार पक्षी आहे. तो माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकतो. बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात. भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतात.
- संपूर्ण जगात ह्या सुंदर आणि चमकदार पिसे असणाऱ्या पक्षाच्या ३५० हून अधिक प्रजाती आहेत. पोपटाच्या बऱ्याच प्रजाती मध्ये नर आणि मादा सारखेच दिसतात, त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी करावी लागते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा